मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा ही सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान तिच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, ज्योतीने लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडीओ आणि डेटा जप्त करण्यात यश आले असून यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
ज्योती मल्होत्रा ही पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ज्योतीचे एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याद्वारे ज्योतीने लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये पठाणकोट सीमावर्ती भागातील काही संशयास्पद व्हिडीओ आढळल्याची माहिती आहे.
हे वाचलंत का? - पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! शहराध्यक्षांवर गंभीर आरोप; संगीता तिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार
यासोबतच देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक संवेदनशील बाबी सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील पाक दुतावासासोबत ज्योती मल्होत्राच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग्सही याद्वारे जप्त करण्यात आले आहेत. ज्योती मल्होत्राने काश्मीरमध्ये बनवलेल्या व्हिडीओची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये काही संवेदनशील माहिती आढळते का? यादृष्टीने तपास सुरु आहे.