भारतीय सैन्याचं सीमारेषेजवळील नागरीकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर

20 May 2025 16:15:25
Indian Army conducts free medical camp for civilians near border
श्रीनगर : ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक सामान्य लोक जखमी झाले किंवा त्यांचं नुकसान झालं. याच लोकांसाठी भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.
हे शिबिर पूर्णपणे नि:शुल्क आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, राजौरी सेक्टर हा सर्वात जास्त प्रभावित भाग होता. इथे अनेक लोकांच्या घरांचे नुकसान झाले. काही लोक जखमी झाली .अशा गरजू लोकांना मदत करण्यासाठी सैन्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडले ?

ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले , पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.या कारवाईत १००हून अधिक दहशतवादी ठार झाले.
पाकिस्तानने भारतावर तुर्कीचे ड्रोन आणि चीनी डिफेन्स सिस्टम वापरून हल्ला केला. त्यांनी वापरलेली क्षेपणास्त्रे भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमने नष्ट केली. यानंतर भारताने ९ आणि १०मे च्या रात्री राफेल विमानांद्वारे पाकिस्तानच्या ६ हवाई आणि लष्करी तळांवर हल्ला केला. शेवटी पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली. १० मेच्या संध्याकाळी युद्धविराम जाहीर झाला
Powered By Sangraha 9.0