बलुचिस्तानने उडवली पाकड्यांची झोप! चिनी डोंगफेंग आर्मर्ड व्हेईकल केले उद्ध्वस्त

20 May 2025 13:49:03

Balochistan IED attack on Pakistan Army
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Balochistan IED attack on Pakistan Army) ऑपरेशन सिंदूर दरम्यान बलुचिस्तानातील बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार हल्ला चढवला. भारताने पाकिस्तानची शस्त्रास्त्रे उध्वस्त केलीच, मात्र बलुचिस्तानातील बलुच लिबरेशनल आर्मी सुद्धा पाकिस्तानने खरेदी केलेली चिनी शस्त्रे उध्वस्त करण्यात सक्रीय झाली आहेत. या प्रकरणी समोर आलेल्या एका व्हिडिओने पाकिस्तानची झोप उडवून टाकल्याचे पाहायला मिळतेय. भूसुरुंगाच्या स्फोटात बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या चिलखती वाहनाचे अक्षरशः तुकडे केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते आहे.
 
बीएलए आर्मीने लक्ष्य केलेले हे एक चिनी डोंगफेंग आर्मर्ड व्हेईकल होते जे पाकिस्तानने चीनकडून खरेदी केले होते. यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ बलुचिस्तानमधील बंडखोरांनी नुकताच प्रसिद्ध केला. बंडखोरांनी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डही केली आहे. स्फोटानंतर, बंडखोरांनी वाचलेल्या पाकिस्तानी सैनिकांवरही गोळीबार केल्याची माहिती आहे.

२०२१ मध्ये, पाकिस्तानला चीनकडून अशा ३०० वाहनांचा खेप मिळाला होता. २०१७ मध्ये चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पुढील पिढीतील वाहन म्हणून या वाहनाचा समावेश करण्यात आला. याचे इतर अनेक प्रकार देखील उपलब्ध आहेत. पाकिस्तानने २०२१ मध्ये दहशतवादविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानी सैन्यात त्याचा समावेश करून घेतला होता.


 स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर बलुचिस्तानात नुकताच एक भीषण स्फोट घडवून आणला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले. रविवारी संध्याकाळी अब्दुल जब्बार परिसरात हा स्फोट झाला होता. दहशतवादाविरुद्धची लढाई आमच्यासाठी राष्ट्रीय लढाई असून शेवटचा दहशतवाद्याचा खात्मा होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही. अशी प्रतिक्रिया बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी व्यक्त केली होती.


Powered By Sangraha 9.0