स्वयंभू श्री सत्येश्वर मंदिर तृतीय वर्धापन दिन सोहळा - २०२५

02 May 2025 15:48:24
 
Third Anniversary of Swayambhu Shri Satyeshwar Temple
 
लांजा - ( Third Anniversary of Swayambhu Shri Satyeshwar Temple ) रत्नागिरी जिल्हा,लांजा तालुक्यातील वनगुळे गावी वनगुळे ग्रामविकास मंडळ,मुंबई/ग्रामीण आणि वनगुळे रहिवाशी यांच्या सहयोगाने ग्रामदैवत स्वयंभू श्री सत्येश्वर मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
 
या शुभप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा - भजन स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू,श्री सत्येश्वर दैवताची शास्त्रशुद्ध नित्य पूजा, लघुरुद्र अभिषेक,मंदिर पालखी प्रदक्षिणा,महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम वनगुळे ग्रामविकास मंडळाच्या पुढाकाराने गावातील हौशी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.
 
वनगुळे ग्रामविकास मंडळ संचालित वनश्री कलामंच प्रस्तुत "रंग कलेचा, गंध मराठी मातीचा" हा आगळावेगळा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तरी पंचक्रोशीतील समस्त रहिवाशी यांनी या शुभ कार्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन वनगुळे ग्रामविकास मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय देऊ गुरव यांनी केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0