नवी दिल्ली, नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील दुसरी सुनावणी दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात झाली. या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपपत्राची दखल घेण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकण्याचा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपपत्राची दखल घेताना प्रस्तावित आरोपींना सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. निष्पक्ष सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही स्तरावर सुनावणीचा अधिकार आवश्यक आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होईल.