मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
हे वाचलंत का? - 'एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबईत एज्युकेशन सिटी उभारणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करून दिला. तसेच या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.