जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी!

02 May 2025 19:37:27
 
Jitendra Awhad
 
मुंबई : शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी यासंबंधीचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
 
 
 
हे वाचलंत का? - लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला मिळणार एप्रिलचा हप्ता; मंत्री अदिती तटकरेंची माहिती  
 
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी दोन स्क्रीनशॉट शेअर केले असून त्यांना २ नंबर वरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. तसेच आरवाच्य शिव्यांचे मेसेजस पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना टॅग करत त्यांना या घटनेची दखल घेण्याची विनंती केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0