मुंबई, राज्यातील शिक्षण क्षेत्राला मोठा हातभार लावत, दोन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे — द युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके) आणि द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) यांनी नवी मुंबई एज्युसिटीमध्ये कॅम्पसेस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoUs) केले आहेत. हा स्वाक्षरी समारंभ दिनांक २ मे २०२५ रोजी वेव्ह्ज २०२५ समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
हे सामंजस्य करार स्वतंत्रपणे विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, एरूलर्निंग सोल्यूशन्स प्रायवेट लिमिटेड (एरूडिटस), द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) चे प्रो व्हाइस चान्सलर (ग्लोबल एंगेजमेंट्स) आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचे व्हाइस चान्सलर आणि प्रेसिडेंट यांच्यामध्ये करण्यात आले.
या प्रसंगी शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको आणि राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको हे देखील उपस्थित होते. हा उपक्रम शैक्षणिक संधी वाढवण्यास आणि परिसराच्या विकासाला गती देण्यास मदत करेल, तसेच नवी मुंबईचे एक उदयोन्मुख शैक्षणिक केंद्र म्हणून स्थान अधिक भक्कम करेल.