जगाला भुरळ घालणारी भारतीय कहाणी एकता कपूर यांचं वेव्स २०२५ मध्ये स्पष्ट मत!

02 May 2025 17:50:24

Ekta Kapoor opinion on Waves 2025
 
मुंबई: ( Ekta Kapoor opinion on Waves 2025)  वेव्स २०२५ या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एमिमी पुरस्कार विजेत्या निर्माती एकता आर. कपूर यांनी जागतिक पातळीवरील कहाण्यांच्या बदलत्या स्वरूपावर आपलं स्पष्ट मत मांडलं. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वतंत्र उत्पादन साम्राज्य उभारणाऱ्या कपूर यांनी सांगितलं की, "कथाकथन हे केवळ भाषेपुरतं मर्यादित नसून, त्यामागे भावना, संवाद आणि लोकांशी जोड निर्माण करणं महत्त्वाचं असतं."
 
त्यांनी स्पष्ट केलं की कोरियन, तुर्की, अमेरिकन, स्पॅनिश किंवा युरोपियन कंटेंटसारखाच भारतीय कंटेंटही आता जगभरात स्वीकारला जात आहे. “ग्लोबल प्लॅटफॉर्म्स आणि नेटवर्क्सने हे दाखवून दिलं आहे की भाषा ही अडथळा राहिलेली नाही. डबिंगमुळे प्रेक्षक कहाणीचा आनंद घेतात आणि भावनेशी जोडतात,” असं त्या म्हणाल्या. भारतीय कथाकथनाच्या समृद्ध परंपरेबद्दल बोलताना एकता म्हणाल्या, “आपल्याकडे सर्वात जुनी आणि समृद्ध कहाणी परंपरा आहे. ही एक चलनासारखी शक्ती आहे – आणि ती आता खऱ्या अर्थाने ओळखली जाऊ लागली आहे.”
 
भारतीय कंटेंटच्या जागतिक पातळीवरील प्रसाराला पूर्वी अनेक अडचणी आल्या, हे त्यांनी मान्य केलं, पण आता स्थिती बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं. “आपण आता त्या दिशेने पोहोचतो आहोत,” असं म्हणत त्यांनी भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या वाढत्या जागतिक पोहोचीकडे लक्ष वेधलं. पण पुढे त्यांनी हेही सांगितलं की केवळ पारंपरिक-जातीय (ethnic) कहाण्यांवर भर न देता, व्यापक आणि वैश्विक स्वरूपाच्या कथा सांगण्याची ही वेळ आहे. “माझ्या मते आता आपल्याला ‘नॉन-एथनिक स्टोरीटेलिंग’कडे वळणं गरजेचं आहे. आपण एका निर्णायक टप्प्यावर आहोत,” असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0