माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन!

02 May 2025 13:55:36
 
Arun Jagtap
 
अहिल्यानगर : माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन झाले आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते अरुणकाका या नावाने सर्वत्र परिचित असून त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
 
अरुण जगताप यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अरुण जगताप हे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे वडील आहेत.
 
हे वाचलंत का? -  ‘एआय’ प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा!
 
अरुण जगताप हे राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भुषवली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0