शिखर संमेलनात अभिनेता नागार्जुन यांची उपस्थिती; चित्रपटसृष्टीसाठी सरकारच्या प्रयत्नांचे स्वागत!

    02-May-2025
Total Views |
 
Actor Nagarjuna presence at WAVES 2025 Summit Government efforts for the film industry welcomed!
 
मुंबई: ( Actor Nagarjuna presence WAVES 2025 Summit ) शिखर संमेलनात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी उपस्थित राहून या मंचाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिलं. विविध राज्यांतून आणि सर्जनशील क्षेत्रांमधून आलेल्या प्रतिनिधींनी या संमेलनात एकत्र येत भारताच्या चित्रपट आणि माध्यमसृष्टीच्या भविष्यावर विचारमंथन केलं.
 
नागार्जुन यांनी आपल्या भाषणात सरकारच्या या पुढाकाराचं स्वागत करत म्हटलं, "इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. फिल्म आणि मिडिया इंडस्ट्रीसाठी सरकारकडून घेतलेली ही पुढाकाराची दिशा प्रशंसनीय आहे. अशा प्रकारची व्यासपीठं कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि निर्मात्यांना एकत्र आणण्याचं कार्य करतात.  ते पुढे म्हणाले, "आज भारतीय सिनेमा विविध भाषांमध्ये आणि विविध माध्यमांतून जागतिक स्तरावर पोहोचत आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा सगळ्या फिल्म इंडस्ट्री एकत्र आल्या, तर आपण जागतिक स्तरावर एक सशक्त आवाज बनू शकतो. सरकारने चित्रपटसृष्टीला केवळ मनोरंजनाचं साधन न मानता, एक आर्थिक आणि सांस्कृतिक शक्ती म्हणून ओळख दिली आहे, ही फारच सकारात्मक गोष्ट आहे."
 
नागार्जुन यांनी हेही नमूद केलं की WAVES 2025 हे केवळ चर्चा मंच नसून, पुढील धोरणं आखण्यासाठी एक विचारशील आधार आहे. "आपण सर्वांनी एकत्र येऊन नव्या कल्पना, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आणि जागतिक दर्जाच्या कथा सादर करायला हव्यात. सिनेमा ही फक्त कला नसून, समाजाशी संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं या शिखर संमेलनात अनेक चर्चासत्रं, सर्जनशील कार्यशाळा, आणि धोरणात्मक बैठकांचा समावेश असून, सरकार आणि कलाविश्व यांच्यातील सहकार्याचे नवे दरवाजे उघडण्याचा यामागचा उद्देश आहे.