मुंबई : महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.
गृहनिर्माण प्रकल्पांप्रमाणेच नोंदणीकृत एजंटसची संख्याही महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त आहे. सध्या महारेराकडे ५० हजार ६७३ एजंटस नोंदणीकृत आहेत. यात नेहमीप्रमाणे मुंबई महानगरचा (MMR) समावेश असलेल्या कोकणात 21 हजार 50 असे सर्वात जास्त एजंटस आहेत . त्यानंतर पुणे परिसरात 8205, नागपूर परिसरात 1504,उत्तर महाराष्ट्रात 490, संभाजीनगर परिसरात 343 आणि अमरावती परिसरात 237 एजंट नोंदणीकृत आहेत.
स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. 18 हजार 693 पैकी काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही, म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.
परिसर निहाय नोंदणीकृत एजंटसचा तपशील
कोकण- 21,050
मुंबई शहर- 3457
मुंबई उपनगर- 8365
ठाणे- 6760
रायगड- 1340
पालघर- 1086
रत्नागिरी- 31
पुणे परिसर- 8205
पुणे - 7931
कोल्हापूर- 84
सातारा- 76
सोलापूर- 70
नागपूर परिसर- 1504
नागपूर- 1357
चंद्रपूर- 57
भंडारा- 45
गोंदिया - 40
उत्तर महाराष्ट्र- 490
नाशिक- 324
अहिल्यानगर- 92
जळगाव-53
धुळे- 19
संभाजीनगर परिसर- 343
संभाजीनगर - 132
बीड- 68
लातूर- 46
नांदेड- 37
धाराशीव- 27
परभणी - 14
जालना - 11
अमरावती परिसर- 237
वर्धा - 95
अमरावती - 48
अकोला - 36
बुलडाणा - 29
यवतमाळ- 27