नवी दिल्ली : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारा संभाव्य हल्ला परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ८ मे रोजी रात्री, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन्स पाठवले गेले होते. त्याचा मुख्य उद्देश अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा होता. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या ड्रोन्सना आधीच वर्तवले होते. त्यामुळे नाश करणे सोपे झाले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन्सना कसे पाडले हे दाखवले आहे.
पाकिस्तानने अनेक स्फोटकांनी भरलेले ड्रोन्स पंजाबच्या सीमेजवळ पाठवले होते. अमृतसर, पठाणकोट, फिरोझपूर आणि बटाला ही ठिकाणे लक्ष्य होती. रडार आणि शस्त्रांनसह जवान सज्ज होते. त्यामुळे एकाही ड्रोनला लक्ष्य गाठता आले नाही. या ड्रोन्समधून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती. सुवर्ण मंदिरासारख्या धार्मिक स्थळी हल्ला झाला असता, तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. परंतु भारतीय लष्कर आधीपासूनच तयार असल्याने धोका टळला.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवाई संरक्षण प्रणालीत रडार्स, आकाश मिकाईल प्रणाली, एल-७० डिफेन्स गन्स यांचा समावेश आहे. हे सर्व एकत्र काम करतात. त्यामुळे शत्रूच्या ड्रोन्सना वेळेवर शोधता आले. पंजाबचे नागरिक आणि सुवर्ण मंदिर प्रशासनाने भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. भारतीय लश्कराच्या सावधतेमुळे आज सुवर्ण मंदिरासारख्या धार्मिक ठिकाणी गेलेले सर्व भाविक सुखरूप आहेत.