ध्रुव राठी पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात; शिख समुदायाच्या विरोधानंतर 'तो' व्हिडिओ केला डिलीट!

19 May 2025 17:57:29

Dhruv Rathi video on sikh history

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dhruv Rathi video on sikh history) 
शीख गुरुंचा एआय व्हिडिओ तयार केल्याने प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी चांगलाच वादात सापडला आहे. 'द राइज ऑफ शीख' नावाचा एक एआय व्हिडिओ ध्रुव राठी याने नुकताच प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शीख योद्ध्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याचे दिसतेय. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने ध्रुव राठीच्या व्हिडिओचा तीव्र निषेध केला. याप्रकरणी झालेल्या तीव्र विरोधानंतर ध्रुव राठीने सदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरून काढून टाकला.

हे वाचलंत का? : हरिहर मंदिर प्रकरणी मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी व्हिडिओचा निषेध केला आणि म्हटले की, असे चित्रण शीख रहत मर्यादाचे उल्लंघन आहे, जे गुरु साहिबांचे दृश्य चित्रण करण्यास मनाई करते आणि शीख समुदायाच्या भावनांना खोलवर दुखावते. त्यांनी सांगितले की, आदरयुक्त भाषेचा अभाव होता आणि दिशाभूल करणारे तथ्य सादर केले गेले. दरम्यान, दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनीही ध्रुव राठीच्या या व्हिडिओचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिले की, ध्रुव राठी यांच्या अलीकडील "द शीख वॉरियर हू टेररिफाईड द मुघल" या व्हिडिओचा मी निषेध करतो, जो केवळ तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा नाही तर शीख इतिहास आणि भावनांचा घोर अपमान आहे.

Powered By Sangraha 9.0