स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या बलुचिस्तानात भीषण स्फोट!

19 May 2025 15:43:23

Blast in Balochistan

इस्लामाबाद : (Blast in Balochistan)
बलुचिस्तानात नुकत्याच झालेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. दुचाकीमधील स्फोटकांच्या माध्यमातून हे करण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. दरम्यान बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी हल्लेखोरांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

हे वाचलंत का? : जुना वाद पुन्हा उफाळला! दोन कुटुंबात जोरदार हाणामारी; तीघांचा मृत्यू चार जण जखमी

मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळी अब्दुल जब्बार परिसरात हा स्फोट झाला. किला अब्दुल्लाचे उपायुक्त रियाझ खान यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, स्फोटके एका वाहनात ठेवण्यात आली होती. परिस्थिती लक्षात घेता, बॉम्ब निकामी पथक आणि सुरक्षा दल घटनास्थळी तैनात करण्यात आले असून आरोग्य सेवा यंत्रणाही जागेवर उपस्थित आहेत.

दहशतवादाविरुद्धची लढाई आमच्यासाठी राष्ट्रीय लढाई
दहशतवादाविरुद्धची लढाई आमच्यासाठी राष्ट्रीय लढाई आहे. शेवटचा दहशतवाद्याचा खात्मा होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तथापि, दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान स्वतःला दहशतवादाचा बळी असल्याचे बोलतो हे केवळ एक ढोंग ठरेल. तथापि, बलुचिस्तानमधील बलुच सैन्यानेही स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा संघर्ष तीव्र केला आहे.
- सरफराज बुगती, मुख्यमंत्री, बलुचिस्तान
 
 
Powered By Sangraha 9.0