भारतीय सैन्याचा सन्मानार्थ कांदिवलीच्या नागरिकांतर्फे तिरंगा पदयात्रा

18 May 2025 17:40:54
 
Tricolor rally by citizens of Kandivali
 
मुंबई: ( Tricolor rally by citizens of Kandivali ) ऑपरेशन सिंदूरच्या अद्भुत यशानंतर, भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी 'तिरंगा पदयात्रा' कांदिवली पूर्व विधानसभेतील समस्त नागरिकांनी कांदिवली पूर्व आणि मालाड पूर्व येथे आयोजित केली होते. या पदयात्रेला कांदिवली पूर्वचे आमदार श्री अतुल भातखळकर उपस्थित होते.
 
आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्तं करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि शौर्याला आम्ही सलाम करतो, आम्हा सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे अशा कृतज्ञ भावना भातखळकर यांनी व्यक्तं केल्या.
 
तसेच माजी सैनिक कर्नल श्री. जगदीश बरसीचा, कर्नल श्री. अशोक झा, भारतीय सशस्त्र सेनेतील माजी अधिकारी श्री. बलराम रेड्डी, श्री. जगदीश सिंह, श्री. सुनील राउल, कमलेश शर्मा, भारतीय नौदलचे माजी अधिकारी श्री. मदनलाल शर्मा, भारतीय वायुदलाच्या माजी अधिकारी श्रीमती अंजली नेरुला सर्वश्री धरम सिंह राठी, गजानन पालवे, हरचित बरार, आणि सुभेदार चोप्रा या निवृत्त सैनिकांचा मालाड पूर्व येथील सी.ओ.डी. येथे सन्मान आणि अभिनंदन करून यात्रेचा समारोह करण्यात आला. नागरिकांनी आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेस मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0