नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी! प्रथमच रचला 'हा' विक्रम

    17-May-2025
Total Views | 20
 
Neeraj Chopra
 
मुंबई : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने धडाकेबाज कामगिरी केली असून पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याने ९० मीटर भालाफेकीचा टप्पा पार करून नवा इतिहास रचला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे देशभरातून त्याचे कौतूक करण्यात येत आहे.
 
नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीग २०२५ या स्पर्धेत वैयक्तिक ९० मीटर भालाफेकीचा टप्पा पार करून ९०.२३ मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासह दोहा डायमंड लीग २०२५ या स्पर्धेत नीरज चोप्राने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. नीरज चोप्राने प्रथमच हा विक्रम रचला असून त्याने केलेल्या केलेल्या या नव्या विक्रमामुळे संपूर्ण देशातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
हे वाचलंत का? -  पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' खासदारांवर महत्वाची जबाबदारी!
 
नीरज चोप्रा जे ऑलिम्पिकमध्ये करू शकला नाही ते आता त्याने करून दाखवले आहे. नीरज चोप्राची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात असून त्याने सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम केला आहे. नीरज चोप्राला नुकतीच प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवीही देण्यात आली आहे.
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121