नवी दिल्ली ( India attacked Noor Khan Airfield ) पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली आहे. त्यांनी खुलासा केला आहे की, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ९ आणि १० मे च्या मध्यरात्री २:३० वाजता ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला होता.
भारतीय लष्करी कारवाईबाबत पाक नेहमीच लपवाछपवी करत असतो. यावेळी मात्र थेट पंतप्रधानांनीच भारताच्या तडाख्याची कबुली दिली आहे. इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकात आयोजित 'यौम-ए-तश्कुर' कार्यक्रमात बोलताना शहबाज शरीफ म्हणाले की, ९-१० मे रोजी रात्री २.३० वाजताच्या सुमारास, लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मला फोन करून माहिती दिली की हिंदुस्थानी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केला आहे. पाक पंतप्रधानांच्या या कबुलीजबाबामुळे पाकच्या सैन्यदलांना भारताने जबरदस्त दणका दिल्याचे स्पष्ट झाले आहे.