भारताच्या समुद्रहद्दीत चीनची हेरगिरी

    17-May-2025
Total Views |
 
Chinese in Indian maritime borders
 
नवी दिल्ली : ( Chinese in Indian maritime borders ) भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीनच्यादेखील कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनचे हेरगिरी करणारे जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळले आहे. यानंतर भारतीय नौदल कारवाईत उतरले असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनचे गुप्तचर जहाज ‘दा यांग हाओ’ मलक्का सामुद्रधुनीतून थेट बंगालच्या उपसागरात पोहोचले. चीनने या जहाजाला ‘संशोधन जहाज’ म्हणून संबोधले असले, तरी भारतासह इतर देश या चिनी जहाजाला ‘गुप्तहेर जहाज’ म्हणून ओळखतात. हे जहाज समुद्राच्या खोलीचा नकाशा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
 
या जहाजाच्या मदतीने चीन क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास आणि पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम झाला आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनही ऐकू शकते. चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाजे आहेत. यांपैकी तीन जहाजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.