- पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताचा दणका
16-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की ग्राउंड-हँडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान तुर्कीने किस्तानला पाठिंबा दिल्यानंतर वाढत्या प्रतिक्रियांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका अधिकृत आदेशात, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने म्हटले आहे की, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्राउंड हँडलिंग एजन्सी श्रेणीतील सुरक्षा मंजुरी दिली होती. मात्र, महासंचालकांनी आपल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षा मंजुरीला तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.
सेलेबी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुमारे ७० टक्के ग्राउंड ऑपरेशन्स हाताळते, ज्यामध्ये प्रवासी हाताळणी, भार नियंत्रण, कार्गो सेवा, टपाल सेवा, गोदाम व्यवस्थापन आणि पूल ऑपरेशन्स यांचा समावेश आहे. ते भारतातील अनेक विमानतळांवर देखील कार्यरत आहे.
राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
केंद्र सरकारने सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केल्यानंतर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले की, देशाची सुरक्षा आणि हितसंबंध सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा चालवणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करावी. भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा चालवणारी तुर्की कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडवर बंदी घालण्यासाठी आम्हाला संपूर्ण भारतातून विनंत्या मिळाल्या आहेत.