मध्य रेल्वेचा यशस्वी पर्यावरणपूरक उपक्रम

16 May 2025 19:53:08


Central Railway


मुंबई : 
मध्य रेल्वेने, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ८६.७१% हेड-ऑन जनरेशन (एचओजी) परिचालन प्रभावीपणे साध्य केले आहे. या उल्लेखनीय प्रगतीमुळे पर्यावरणीय मंजुरी आणि ऑपरेशनल खर्चात अंदाजे १७०.७ कोटी रुपयांची बचत झाली आहे.


हेड-ऑन जनरेशन (एचओजी) ही एक आधुनिक वीज पुरवठा प्रणाली आहे, जिथे लोकोमोटिव्हद्वारे ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्स (ओएचई) मधून थेट वीज घेतली जाते आणि वातानुकूलित, प्रकाशयोजना आणि इतर विद्युत गरजांसाठी ट्रेनच्या डब्यांमध्ये वितरित केली जाते. ही नाविन्यपूर्ण प्रणाली पारंपारिक एंड-ऑन जनरेशन (ईओजी) पद्धतीची जागा घेत आहे, जी ट्रेनला जोडलेल्या डिझेल-चालित जनरेटर कार वर अवलंबून असते.


ईओजी च्या विपरीत, ज्यामध्ये ट्रेनच्या दोन्ही टोकांना दोन डिझेल जनरेटर कारची आवश्यकता असते, एचओजी लोकोमोटिव्हमधून अखंडपणे वीज घेते, ज्यामुळे जनरेटर कारची आवश्यकता कमी होते, डिझेलचा वापर कमी होतो आणि हानिकारक उत्सर्जन कमी होते. एचओजी मध्ये बदल केल्यामुळे रेल्वेमध्ये काम शांत, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम ट्रेन ऑपरेशन होतात.


विभागनिहाय बचत
मुंबई विभाग – १३६.१६ कोटी रुपये
पुणे विभाग - २२.३१ कोटी रुपये
नागपूर विभाग - ६.९६ कोटी रुपये
सोलापूर विभाग – ३.६८ कोटी रुपये
भुसावळ विभाग – १.५९ कोटी रुपये
Powered By Sangraha 9.0