बांग्लादेशी फूलजानची भारतात घुसखोरी! ओळख लपवून अजमेरला वास्तव्य...

16 May 2025 15:56:36
 
Bangladeshi in rajsthan
 
 
जयपूर : ( Bangladeshi in rajsthan ) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आता कडक कारवाई सुरू झाली आहे. राजस्थानच्या अजमेर येथील स्पेशल टास्क फोर्सने बेकायदेशीररीत्या भारतात राहत असलेल्या फूलजान या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली संबधित महिला ही गंज पोलीस स्टेशन हद्दीतील नागफणी परिसरात राहत होती. ती बांगलादेशच्या विविध भागात राहिली. त्यानंतर ती अजमेरला आली, तेव्हापासून ती नागफणी परिसरात राहत होती.
 
सुरक्षा दलांची नजर चुकवत तिने गुप्तपणे बेनापोलची भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. तेव्हापासून ती भारतात राहत होती. पोलीसांनी तिचा तपास सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्य असलेल्या हलिमा खातून आणि रबिउल इस्लाम यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान या दाम्पत्याने सांगितले की १० वर्षांपूर्वी ते बेकायदेशीरपणे भारतीय सीमेत घुसले आणि आपली खरी ओळख लपवून अजमेरमध्ये राहू लागले.
 
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अशा बांगलादेशींमुळे एसटीएफने राजस्थानमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. या शोधमोहीम अंर्तगत आतापर्यंत ३५ बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या घुसखोर बेकायदेशीरपणे बांगलादेशींना तात्काळ अटक केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0