डोंबिवली: ( news for Dombivli residents ) सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ यांच्यातर्फे आगळ्य़ा वेगळ्य़ा उपक्रमात झिरो शॅडो निरीक्षण केले जाणार आहे. याअंतर्गत दि. 17 मे रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत सुभाष मैदान, अत्रे रंगमंदिरामागे, कल्याण (प.) येथे ‘...हा खेळ सावल्यांचा’ कार्यक्रम होणार आहे.
आकाश मित्र मंडळाचे खगोल अभ्यासक हेमंत मोने मार्गदर्शन करणार आहेत. सावली आपली कधी ही साथ सोडत नाहीत, असे म्हणतात. पण हीच सावली गायब होणार आहे. खरेतर वर्षातून दोनदा घडणारी ही भौगोलिक घटना आहे. जेव्हा मध्यान्हाचा सूर्य बरोबर आपल्या शहरातील अक्षांशावर येतो. तेव्हा ही स्थिती अनुभवता येते.
आपण आपल्या लहान मुलांसह मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, आणि या अनोख्या घटनेचे साक्षीदार व्हावे असे आवाहान संस्थेतर्फे करण्यात आले आहे.