नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ७ एप्रिल रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे एकूण नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. पाकने प्रतिउत्तर म्हणून भारताच्या सीमेवरील शहरे व प्रार्थना स्थळांवर ड्रोनचे हल्ले केले. भारतीय सैन्यानी हे हल्ले हाणून पाडले. पुढे काही दिवस भारत-पाकमध्ये तणावाचे वातावरण सुरू होते. या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानला कोणतेही नुकसान झालेलं नाही, असा खोटा दावा पाकिस्तान करत होता.
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका रिपोर्टमध्ये असे सांगितले की “हल्ल्यादरम्यान पाकिस्तानचे मोठे नुकसान झालेले आहे, जरी ते मान्य करत नसले तरी सॅटलाईट चित्रांमध्ये हल्ला करण्यापूर्वीचे आणि नंतरची स्थिती स्पष्ट दिसून येते आहे. दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केल्याने गंभीर नुकसान केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या भोलारी हवाई तळावर, भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी विमानांवर अचूक हल्ला केला’’.
रिपोर्टनुसार, ‘पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापासून आणि पंतप्रधान कार्यालयापासून सुमारे १५ मैल दूरवर असलेल्या नूर खान हवाई तळ, कदाचित भारताने हल्ला केलेले सर्वात अवघड लष्करी लक्ष्य होते व रहीम यार खान एअरफील्ड, सरगोधा एअरबेस, जागारुर आणि सियालकोट एअरबेस सारख्या स्थळांवर देखिल भारताने हल्ले केले आहे.’’
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या रिपोर्टनंतर ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालातही पाकिस्तानचे झालेले स्पष्टपणे प्रकाशित केलेले आहे. सहा एअरबेस, तीन हँगर्स, दोन रनवे आणि एअरफोर्सचे चार मोबाईल टॉवरचे नुकसान झाले, असे सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने वॉशिंग्टन पोस्टने दाखवले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करारही झाला होता. मात्र, पाकिस्तानने या करारे उल्लंघन अवघ्या तीन तासातच केले. त्यामुळे पाकिस्तानने जर हा हल्ला परत केला तर त्याला युद्ध म्हणून घोषित केले जाईल, असा इशारा भारताने दिला होता.