पाकिस्तानी झेंडे आणि तत्सम वस्तूंची भारतात विक्री? केंद्र सरकारने दिले कारवाईचे आदेश

15 May 2025 12:36:48



Sale of Pakistani flags and other items in India, Central government orders action





नवी दिल्ली
: भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांवर पाकिस्तानी झेंडे किंवा इतर संबंधित वस्तू विकण्यास बंदी घातली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून ‘अ’मेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘उबे’, ‘इट्सी’, ‘द फ्लॅग कंपनी’ आणि ‘द फ्लॅग कॉर्पोरेशन’ या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवार १४ मे रोजी अधिकृत एक्स हँलवरून दिली.


"या प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी झेंडे व इतर वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या विक्रीवर आम्ही कठोर भूमिका घेतली आहे," असे जोशी यांनी सांगितले. या वस्तू लवकरात लवकर प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेशही दिले आहेत. "नागरिकांच्या भावना दुखावणारे व्यवहार चालवून घेतले जाणार नाहीत," असा इशारा त्यांनी दिला आहे. सर्व ऑनलाईन कंपन्यांना भारताच्या कायद्यांचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0