मुंबई : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पाकिस्तानने एक पत्र लिहीत सिंधू जल कराराचा पुनर्विचार करा अशी विनवणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची विनवणी केली आहे. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. १९६० च्या करारानुसार लाखो लोक पाण्याच्या वाटपावर अवलंबून आहेत, असे म्हणत पाकिस्तानने सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती भारताला केली आहे.
हे वाचलंत का? - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले...
पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांना हे पत्र पाठवले आहे. मात्र, भारत आपल्या निर्णयावर ठाम असून भारताने पाकिस्तानची ही विनंती धुडकावून लावल्याचे सांगण्यात येत आहे.