नीरज चोप्रा भारताच्या टेरिटोरियल आर्मीत 'लेफ्टनेंट कर्नल'पदी नियुक्त

15 May 2025 11:42:49

Neeraj Chopra Indian Army

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Neeraj Chopra Indian Army)
ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि भालाफेक स्पर्धेतील नामवंत खेळाडू नीरज चोप्रा यांस प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देण्यात आली आहे. लष्कराकडून मिळालेल्या या सन्मानाने पुन्हा एकदा सिद्ध झाले की नीरज हा केवळ एक खेळाडू नाही तर तो भारताच्या आत्मविश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक बनला आहे. टेरिटोरियल आर्मीची मानद पदवी मिळणे हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये गणले जाते, जे नीरजला आता मिळाले आहे.

हे वाचलंत का? : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक

नीरज चोप्रा हे आधीच भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून कार्यरत होते आणि आता या नवीन ओळखीमुळे ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. लष्कराने एका निवेदनात म्हटले की, "नीरज चोप्रा यांचे समर्पण, शिस्त आणि देशभक्ती प्रादेशिक सैन्याच्या भावनेशी सुसंगत आहे. ते तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत." टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्याची ही कामगिरी भारतीय क्रीडा इतिहासात एक मैलाचा दगड ठरली. आता सैन्यात सहभागी होऊन त्याने हे सिद्ध केले आहे की तो केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर देशसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्यास तयार आहे.

यावेळी नीरज म्हणाला, "ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. लष्कराचा गणवेश घालणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मी याकडे एक नवीन जबाबदारी म्हणून पाहतो आणि प्रत्येक पावलावर लष्कराची मूल्ये जपण्याचा प्रयत्न करेन." हे उल्लेखनीय आहे की याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव सारख्या दिग्गज खेळाडूंनाही प्रादेशिक सैन्यात मानद पद देण्यात आले आहे. आता या गौरवशाली यादीत नीरज चोप्रा यांचेही नाव जोडले गेले आहे.

Powered By Sangraha 9.0