मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladeshi Maulana Faruki Hated Speech) बांगलादेशात पुन्हा एकदा इस्लामिक कट्टरपंथींचा उन्माद सुरु झाल्याचा दिसतोय. इस्लामिक धर्मगुरू मौलाना अब्दुल कुद्दुस फारुकी याचा एक भडकाऊ व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. कोलकात्यावर आत्मघातकी हल्ल्याची धमकी देताना ते या व्हिडिओतून दिसते आहे. फारुकी म्हणाला की जर बांगलादेश सैन्याने त्यांना आदेश दिला तर ते कोलकाता ताब्यात घेण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर करणार नाहीत तर आत्मघाती हल्लेखोर पाठवतील.
हे वाचलंत का? : पश्चिम सीमेवरील पराक्रमानंतर पूर्वेकडील दहशतवाद्यांना ठोकलं! भारतीय सैन्याची बेधडक कारवाई
हसन मीडिया नामक एका यूट्यूब चॅनलने दि. ८ मार्च रोजी ११ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, जी बांगलादेशातील हिंदूंनी मोठ्याप्रमाणात शेअर केली. त्यात फारुकी म्हणाला की, जर आत्मघातकी हल्लेखोर चांगले काम करू शकतात, तेव्हा लढाऊ विमानांची गरज काय? व्हिडिओमध्ये फारुकी यांनी तालिबानच्या रणनीतीचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की त्यांनी आत्मघाती हल्ल्यांद्वारे अमेरिका आणि रशियासारख्या मोठ्या शक्तींचा पराभव केला.