राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ! कुणीही जाऊन...; संजय राऊतांचं विधान
14-May-2025
Total Views |
मुंबई : राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर स्तुसीसुमनेही उधळली. बुधवारस १४ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. ते ओपनच आहे. तिथे खिचडी मिळते, तिथे पदवीपण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू. फक्त आमची अट आणि भूमिका अशीच आहे की, ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या. आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये, ही आमची भूमिका आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मी राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन नेत्यांचे नेहमी कौतुक करतो. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. ही माझी शिवसेना, मीच खरा शिवसेनाप्रमुख, असा दावा त्यांनी कधीही केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमले नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले आणि राजकारण सुरू केले. राज ठाकरे यांनीही स्वतःचा पक्ष काढला. त्यावेळी त्यांचे आणि आमचे मतभेद झाले. पण त्यांनी तेव्हा स्वतःचा पक्ष काढून राजकारण केले. त्यांनी एकनाथ शिंदेंप्रमाणे माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे असे सांगितले नाही," असेही संजय राऊत म्हणाले.