हिटमॅन रोहित शर्माने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

    14-May-2025
Total Views |
 
Rohit Sharma Devendra Fadanvis
 
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बुधवार, १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्याने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या भेटीचे काही फोटो पोस्ट करत रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दिनांक ७ मे रोजी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याला सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहे.
 
दरम्यान, आता निवृत्तीनंतर पहिल्यांदाच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांनी यासंबंधीचे फोटो शेअर केले आहेत. "वर्षा या माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत केले. त्याला भेटून आणि त्याच्याशी संवाद साधून खूप छान वाटले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या.