नवी दिल्ली: ( President Draupadi Murmu for Operation Sindoor ) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासह बुधवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. राष्ट्रपती मुर्मू यांनी सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले, ज्यामुळे भारताने दहशतवादाला दिलेला प्रतिसाद हा पराक्रमी ठरला, असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे.