एन्व्हायरोकेअर ग्रीन अवॉर्ड्स २०२५! पर्यावरण प्रेमींनी आजच अर्ज करा!

14 May 2025 12:48:42
 
Envirocare Green Awards 2025
 
मुंबई : एन्व्हायरोकेअर लॅब्समार्फत देण्यात येणाऱ्या एन्व्हायरोकेअर ग्रीन अवॉर्ड्स (EGA) या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एनव्हायरो केअर लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निलेश अम्रितकर यांनी ही माहिती दिली. करण्यात आली असून यासाठी जगभरातील पर्यावरण प्रेमींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
एन्व्हायरोकेअर ग्रीन अवॉर्ड्स (EGA) हा २०१८ मध्ये एन्व्हायरोकेअर लॅब्सने सुरू केलेला एक उपक्रम आहे. पर्यावरण आणि शाश्वततेच्या क्षेत्रातील व्यावसायिक आणि संस्थांना प्रेरणा देणे आणि सक्षम करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
 
हे वाचलंत का? -  न्या. भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ
 
अर्ज करण्याचा कालावधी!
 
दि. २२ एप्रिल ते १० जून २०२५ - अर्ज करण्याची मुदत
२० जून - अर्जांची छाननी
२० जून ते ३० जून - मुल्यांकन
५ जुलै - उपक्रम सादर करणे
१९ जुलै - पुरस्कार वितरण
 
कोण कोण अर्ज करू शकतो?
 
पर्यावरण रक्षणासाठी काम करणारी व्यक्ती, एमएसएमई, कॉर्पोरेट्स, अकादमी, एनजीओ आणि सहकारी गृहनिर्माण संस्था आणि शासकीय संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0