अजितदादांना पुण्यात धक्का! शहराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं कारण काय?

    14-May-2025
Total Views |
 
Ajit Pawar Deepak Mankar
 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
 
पुणे पोलिसांनी दीपक मानकर यांच्यावर जमिनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार करणे तसेच बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरमयान,सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता माझी राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप दीपक मानकर यांनी केला आहे.
 
 
तसेच या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची आणि आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राजकीय बदनामीला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे दीपक मानकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.