भारत दौऱ्यावर येणार का पुतिन? काय झाले मोदीं सोबत बोलण...

13 May 2025 19:29:47
भारत दौऱ्यावर येणार का पूतिन? काय झाले मोदीं सोबत बोलण...


नव्वी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अभिनंदन केले. संवादा, दरम्यान पारंपारिक वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भारत भेट देण्याचे आमंत्रण दिले. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केली शोक व्यक्त, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत वेबसाइट वरुन समजले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन टेलिफोन द्वारे बोलण झाले. पहलगाम येथे २० एप्रिल रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा मनापासून शोक व्यक्त केले. ’सर्व प्रकारच्या दहशतवादाशी तडजोड न करता लढण्याची गरज यावर भर दिला पाहिजे’ असे पुतिन यांचे मत आहे.


दरम्यान, दुसऱ्या महायुद्धात (१९४१-४५) सोव्हिएत संघाच्या विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ९ मे रोजी मॉस्को येथे आयोजित विजय दिन समारंभात सहभागी होण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ ८ ते ९ मे दरम्यान रशियाला भेट दिली. मंत्री सेठ यांनी अज्ञात सैनिकाच्या थडग्यावर पुष्पहार अर्पण केला आणि विविध देशांच्या मान्यवरांसह विजय दिन परेडमध्ये भाग घेतला. त्यांचा सहभाग भारत आणि रशियामधील दीर्घकालीन भागीदारीचे प्रतीक होते.
 
तसेच, नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या संपूर्ण जनतेला महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले व विजय दिन हा सर्वांसाठी सुट्टीचा दिवस आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले. मॉस्को येथे होणाऱ्या ’’वर्धापन दिन समारंभात भारताचा एक प्रतिनिधी सहभागी होईल’’, असे मोदींनी संवादात सांगितले. पारंपारिक वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भारत भेट देण्याचे आमंत्रण भारतीय नेत्यांनी दिले आहे. व्लादिमीर पुतिन यांनी हे आमंत्रण स्वीकारले. असे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत वेबसाइट वरुन समजले.
 




Powered By Sangraha 9.0