वसई/विरार: (occasion of Nurses Day 2025 visionary initiative) नर्सेस डे २०२५ च्या निमित्ताने “नर्स मॉड्यूल : बी युवर बेस्ट” या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. CIAP च्या अध्यक्षीय कृती आराखड्याअंतर्गत साकार झालेला हा आगळा-वेगळा उपक्रम १२० नर्सेस, २ नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या आणि १४ डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमामध्ये नर्सिंग केअर सक्षमीकरणासाठी डॉक्टर आणि नर्स यांच्यातील उत्तम समन्वय दिसून आला. MA वसई व विरार मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यशाळेतील एक महत्त्वाचा भाग ठरला तो स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा — ही जीवनावश्यक कौशल्ये देणारी कार्यशाळा सहभागी नर्सेससाठी अत्यंत उपयोगी ठरली आणि विशेष कौतुकास पात्र ठरली. या मॉड्यूलमध्ये नर्सेसच्या दैनंदिन कामामधील आवश्यक आणि वास्तवाधिष्ठित घटकांचा समावेश होता, ज्यामध्ये
- संवादकौशल्य (Communication Skills)
- नोंदी लेखन (Documentation)
- औषधाचे प्रमाण आणि डोसचे गणित
- इनपुट-आउटपुट चार्ट आणि फ्लुइड मॅनेजमेंट
- नसांमध्ये सलाईन देणे व देखभाल
- रुग्णाचे निरीक्षण व सतर्कता
- क्लिनिकल हँडओव्हर आणि अशाच अनेक व्यावहारिक अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील सहभागींना त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक शिट्टी आणि की-चेनसह सेफ्टी नाइफ भेट देण्यात आली – एक संवेदनशील आणि प्रेरणादायी पाऊल.
या उपक्रमाचे यश Team Palghar च्या परिश्रमामुळे शक्य-
डॉ. अर्चना जोशी, डॉ. हेमंत जोशी, डॉ. नीलेश पलवणकर, डॉ. अनुराधा पलवणकर, डॉ. अंजली गोकरण – यांच्या साथीत डॉ. चित्रा कुलकर्णी (AHA रायगड आणि जॉइंट नॅशनल सायंटिफिक कन्व्हीनर) व डॉ. जयश्री देशपांडे (अध्यक्ष – पालघर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स व नॅशनल को-ऑर्डिनेटर – नर्स मॉड्यूल) यांचे मोलाचे योगदान लाभले.
CIAP चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खलातकर, डॉ. योगेश परिख सर व डॉ. अतनू भद्रा यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल मन:पूर्वक आभार. डॅा वेंकट गोयल व डॅा माधवी गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच डॅा अनुपमा ओक प्राचार्य यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या नर्सेसना सक्षम करण्याचा आमचा संकल्प असाच पुढे सुरू राहील.