महावितरण भांडूप परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी संजय पाटील यांची नियुक्ती

    13-May-2025
Total Views | 20
 
Sanjay Patil appointed as Chief Engineer of Mahavitaran Bhandup
 
मुंबई: (Sanjay Patil appointed as Chief Engineer of Mahavitaran Bhandup) महावितरणच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात नवीकरणीय उर्जा विभागात मुख्य अभियंतापदी कार्यरत असलेले संजय पाटील यांची बदली भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी करण्यात आली आहे. आज मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी  पाटील यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
 
संजय पाटील यांनी आपल्या महावितरणच्या सेवाकाळात विविध महत्वाच्या पदावर काम केले आहेत. २००४ साली थेट निवड प्रक्रियेतून निवड होऊन ते कोल्हापूर परिमंडलात सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर सहाय्यक अभियंता म्हणून कोल्हापूर व सांगली मंडळात त्यांनी काम केले. २०१३ साली त्यांना पदोन्नती मिळून ते अति.
 
कार्यकारी अभियंता म्हणून कोल्हापूर चाचणी विभाग, रत्नागिरी चाचणी विभाग, पुणे रास्तापेठ चाचणी विभाग व वाशी चाचणी विभाग अशा विविध ठिकाणी काम केले असून त्यांनी प्रयोगशाळांच्या एनएबीएल (NABL) अ‍ॅक्रेडिएशनमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. २०१७ साली पदोन्नतीवर ते अधीक्षक अभियंता म्हणून मुख्य कार्यालयात झाली तिथे त्यांनी देयक व महसूल विभागात कार्यरत असताना मुख्य अभियंता पदाचा प्रभार तीन वर्षाकरता सांभाळला. नंतर जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांनी वाशी मंडळ अधीक्षक अभियंता म्हणून वाशी मंडळात चांगली कामगिरी केली आहे. भांडुप येथे रूजू होण्यापूर्वी ते मुख्य कार्यालयात वीज खरेदी विभागात मुख्य अभियंतापदी होते.
 
श्री. संजय पाटील यांच्या महावितरणच्या सेवा काळात विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी केव्हीएएच (KVAH) बिलिंगची संकल्पना सादर केली. बिलिंग व महसूलचे मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना त्यांनी केंद्रीकृत बिलिंग लागू केले व मीटर रीडिंगचे फोटो पडताळणी, बिलिंगची गुणवत्ता सुधारणे यासारख्या सुधारणा केल्या. तसेच, पीडब्ल्यूडब्ल्यू व स्ट्रीट लाईट कनेक्शन सारख्या सरकारी विभागांच्या थकबाकी वसूल करण्यात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
भांडुप परिमंडळामध्ये प्रत्येक विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपली कामाची पूर्णपणे जबाबदारी घेऊन काम करावेत जेणेकरून आपल्या परिमंडलातील इतर कार्यालयांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आपण एक टीम म्हणून काम करून भांडूप परिमंडलात अजून काही चांगले बदल नक्कीच घडवून आणू व ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व महावितरणचा महसूल वाढ करण्यासाठी कार्यरत राहू असे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121