Operation Sindoor LIVE Updates : आम्ही यापुढच्या सर्वच मिशनला तोंड देण्यासाठी सज्ज! महत्वाची अपडेट

    12-May-2025
Total Views |
Operation Sindoor LIVE Updates : आम्ही यापुढच्या सर्वच मिशनला तोंड देण्यासाठी सज्ज! महत्वाची अपडेट

नवी दिल्ली : भारत आणि पाक युद्ध विरामानंतर सोमवार, दि. १२ मे रोजी पुन्हा भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांच्या डीरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सतर्फे (डीजीएमओ) पत्रकार परिषद घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूर संदर्भात तिन्ही दलांच्या प्रमुखांनी युद्धाबाबत नवीन खुलासे केले आहेत. यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हवाई दलाने असे म्हटले होते की, भारतीय हवाई दलाने कराचीतील येथील लष्करी तळालाही लक्ष्य केल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती.

चीनचे क्षेपणास्त्र पाडले


डीजीएमओतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने पाकिस्तानकडून डागण्यात आलेले एक चिनी बनावटीचे क्षेपणास्त्रही पाडले. चीनी बनावटीच्या या पीएल-१५ हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे फोटोही भारतीय लष्कराने प्रदर्शित केले. हे क्षेपणास्त्र भारतावरील हल्ल्यादरम्यान पाकिस्तानने वापरले होते.

पाक सैन्याचा दहशतवाद्यांना पाठींबा


भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, "यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिले की, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना कसा पाठिंबा दिला. पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी भारतावर हल्ला करण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे भारताला चोख प्रत्युत्तर द्यावे लागले." आमची लढाई पाकिस्तानी सैन्याविरुद्ध नाही तर दहशतवाद्यांशी आहे.

डीजीएमओ लेफ्टनंट राजीव घई म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. यातूनच आमच्या निष्पाप भारतीय नागरिकांवर हल्ले होत आहेत. दरम्यान पुढे सैन्याने सांगितले की आम्ही पुढील कोणत्याही युध्द मोहिमेसाठी तयार आहोत.”

आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे, पाकिस्तानी सैन्याशी नाही!


"आमचे उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणे आहे, पाकिस्तानी सैन्याशी लढणे नाही. आमचे सर्व हवाई तळ पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे कार्यरत आहेत आणि कोणत्याही वेळी नवीन युध्द मोहिमांसाठी सज्ज आहेत. असेही लष्कराने पत्रकार परीषदे दरम्यान स्पष्ट केले.