नवनीत राणा यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याची धमकी!

12 May 2025 12:01:30
 
Navneet Rana
 
बई : माजी खासदार नवनीत राणा यांना पाकीस्तानकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नवनीत राणा यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
 
नवनीत राणा यांना 'हिंदू शेरनी हनुमान चालिसा पढने वाली थोडे दिन की मेहमानस जल्द ही उडाने वाले आहे,' अशा आशयाची धमकी आली आहे. पाकिस्तानकडून वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या येत आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली आहे. याआधीही राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकी आल्याने पोलिसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
 
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नवनीत राणांना धमकी आल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0