महत्वाची बातमी : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर!

    12-May-2025
Total Views |
 
10th Result
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख घोषित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून मंगळवार, १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
 
दिनांक २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा लवकर परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही निकालाची प्रतिक्षा लागली होती. जवळपास १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परिक्षा दिली. दरम्यान, आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल.
 
हे वाचलंत का? -  ...म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही! दोन्ही पवार एकत्र येण्यावर काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?
 
कसा पाहणार निकाल?
 
५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीचा निकालाकडे लागले होते. दरम्यान, आता दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org या वेबसाईटवर रोल नंबर आणि आईचे नाव टाकून विद्यार्थी आपला निकाल बघू शकतात.