पाकिस्तानच्या ’पापा चा घड़ा’ भरला!; DGMO नी दिला कडक शब्दांत इशारा!

12 May 2025 20:17:12
पाकिस्तानच्या ’पापा चा घड़ा’ भरला!; DGMO नी दिला कडक शब्दांत इशारा!


नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतासोबत शास्त्रसंधी केल्याचे नाटक करत अवघ्या काही तासानंतर परत युद्धाचे वातावरण निर्माण केले. भारताने ‘ऑपरेशन सिंधू’मध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी तर ३५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. भारताने फक्त पाकच्या सीमेजवळच्या लष्करी तळांवर नाही तर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीपर्यंत कारवाई केली, अशी माहिती रविवार दि. ११ मे रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत भारतीय सैनदलांनी दिली.


डिजीएमओ लेफ्टनंट जनरल सचिव राजीव घई म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी चळवळी बदलल्या आहेत. नागरिकांवर हल्ले केले जात आहेत यावरुन समजते की पाकिस्तानाच्या पापाचा घडा भरला आहे, पण आमचे हवाई क्षेत्रांवर हल्ल्याना प्रत्युत्तर देणे सुरूच आहेत. आमच्या वायूसुरक्षा प्रणालीने पाकिस्तानी ड्रोन आणि यूएवीने केले गेलेले हल्ले थांबवले आहेत.’’

एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की, ’’आमचे स्वदेशी वायू सुरक्षा प्रणाली ’आकाश’ चांगले काम करत आहे. चीनच्या पिएल-१५ मिसाईललाही चोख प्रत्युत्तर दिले, पण दुःखाची गोष्ट आहे कि पाकिस्तानी सैन दहशतवाद्यांना साथ देत आहे त्यामुळे आम्ही उत्तर देण्याचा निर्णय घेतला. आमची लढाई दहश्तवाद्यांसोबत आहे. त्यांच्या सैन्या सोबत नाही.’’

भारत-पाक वादात ट्रम्प यांची मद्ध्यस्ती, शनिवारी १० मे रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सीसफायर घोषणा केली आणि म्हटले की, "सध्याच्या वादाला थांबवण्याची वेळ आली आहे कारण वादामुळे अनेकांचा मृत्यू होऊ शकला असता." पण पाकिस्तानाने घोषणेनंतर लगेचंच तीन तासांत यूद्धाचे वातावरण निर्माण केले. पण तिसर्‍याच्या मध्यसथीची गरज नाही, असे अमेरिकेला भारताने सुनावले आहे.



Powered By Sangraha 9.0