सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर!

11 May 2025 19:57:03
सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर!

मुंबई : भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट (INTT-AT) परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.


पाकिस्तानने आतापर्यंत भारतातील आध्यात्मिक स्थळांना लक्ष्य केले असून, सीमावर्ती भागातील शहरे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारताने त्यांना दर वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


एकिकडे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट (INTT-AT) परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, असल्याची सूचना चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली आहे. ९ मे ते १४ मे दरम्यान नियोजित होत्या. आता सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा १६ मे ते २४ मे दरम्यान घेतल्या जातील.


२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला. गुरुवारी दिनांक ८ मे रोजी रात्री उशिरा, संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांसह विविध प्रमुख ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न वेगाने हाणून पाडला आहे.

Powered By Sangraha 9.0