स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २९६४ पदांसाठी भरती सुरू

10 May 2025 18:23:34

state bank is hiring 2964 candidates to be hired
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी CBO पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण २९६४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
या भरतीसाठी उमेदवारांकरीता वयाचे बंधन आहे. फक्त २१-३० वर्षातील उमेदवार ग्राह्य धरले जातील. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार वेबसाईटवर सांगण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक वाचावी.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे ४५००० ते ४८००० रुपये पगार मिळणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट [sbi.co.in](https://www.sbi.co.in) वर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
Powered By Sangraha 9.0