IAF पायलट बाबत पाकिस्तानचा दावा धादांत खोटा

10 May 2025 16:29:18
IAF पायलट बाबत पाकिस्तानचा दावा धादांत खोटा

 
नवी दिल्ली : भारताकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या पत्रकार परिषदांतून ही दोन नावे प्रकर्शाने पुढे आली. मात्र भारतीय वायुसेनेच्या वैमानिक शिवांगी सिंह यांच्या नावाचीही चर्चा सध्या होतेय. कारण पाकिस्तानने शिवांगी सिंह यांच्याबाबतीत खोट्या बातम्या पसरवत असल्याचे उघडकीस आले आहे.


भारत - पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तान चूकीचे दावे आपल्या हैंडल्स द्वारे करण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय वायूसेनेच्या वैमानिक शिवांगी सिंह यांना पाकिस्ताने ताब्यात घेतल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने एका पोस्टमध्ये शिवांगी सिंह या जेट मधून आपल्या बाजूला पडल्याचे म्हटले आहे. ’’चाय पीनी है, अभिनंदन के बाद एक और मिली.’’ असा खोटा दावा देखील पाकिस्ताने केला. पण पिआयबी ने फॅक्ट चेक केल्या नंतर हे सर्व खोट असल्याचे समोर आले. असे खोटे दावे करुन पाकिस्तान लक्षं वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे पण पिआयबी ने अशा खोटया दाव्यांवर विश्वास ठेऊ नका असे सांगितले आहे.


Powered By Sangraha 9.0