पेट्रोल पंपांवर आता ओन्ली कॅश! नो यूपीआय ट्रान्झॅक्शन्स

10 May 2025 16:31:52

only cash at petrol pumps no upi transactions will be valid
नाशिक : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे विदर्भ, नाशिक आणि नागपूर येथील पेट्रोल पंप चालक संघटनांनी युपीआय आणि कार्डद्वारे इंधन खरेदीकरण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय शनिवार, दि. १० मे पासून लागू करण्यात येत आहे.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या मते, सायबर गुन्हेगार चोरी करताना फेक किंवा चुकीचे डेबिट, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय आयडी वापरतात. दिसताना पैसे मिळाल्याचे कळते पण खात्यामध्ये पैसे जमा होतच नाहीत. अश्या व्यवहारांवरमुळे एखाद्या पेट्रोल पंप मालकाने तक्रार दाखल केली तर बँका त्यांचेच खाते गोठवतात, ज्यामुळे मालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या प्रकारामुळे साधारणतः ३० पेट्रोल पंपांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे, तर दोन वेळा खाती पूर्णपणे बंद केली गेली आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील सगळ्या इंधन ग्राहकांना पेट्रोल पंपावर कॅश घेऊन जावे लागू शकते. सरकारने या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधावा अशी मागणी नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय.
Powered By Sangraha 9.0