नवी दिल्ली : (Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे.
निक्की हॅले यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर देण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पाकिस्तानने उगाच पीडित असल्याचे ढोंग करु नये. दहशतवादी कारवायांना पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे त्यांना कुणीही सहजासहजी माफ करणार नाही. भारतानं जे केलं ते योग्यच आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आणि बिचारे म्हणवत विक्टिम कार्ड खेळू नये. उगाच कांगावा करू नये, असं म्हणत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं आहे.