जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश
10-May-2025
Total Views | 49
पनवेल: (JM Mhatre and Pritam Mhatre join BJP ) पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह आज, शनिवार, दि. 10 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, माजी खा. रामशेठ ठाकूर, खा. धैर्यशील पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. रवी पाटील, आ. विक्रांत पाटील माजी आ. पंडित पाटील, माजी आ. देवेंद्र साटम, माजी आ. सुरेश लाड, उत्तर रायगड भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित राहणार आहेत.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदान, प्लॉट नं. 6 सेक्टर 12 येथे हा पक्ष सोहळा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत संघर्ष, नेतृत्वातील मतभेद आणि कार्यपद्धतीवरील नाराजी यामुळे पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. माजी आ. विवेक पाटील यांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याच्या प्रकरणानंतर पनवेल आणि उरणमधील राजकारणाला वेगळे वळण लागले होते. पक्षाची मलीन झालेली प्रतिमा, विधानसभा निवडणुकीत पराभव आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मदत न केल्यामुळे नाराजी होती. दरम्यान, म्हात्रे कुटुंबासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.