पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त हुतात्मा

10 May 2025 13:59:33

A senior Government officer shot dead in Jammu and Kashmir
श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागात दि. १० मे च्या पहाटे पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारतीय अधिकारी राज कुमार थापा हुतात्मा झालेत. त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यु झाला. हल्ल्यादरम्यान त्यांच्यासह असलेले दोन कर्मचारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.


जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सच्या माध्यमातून म्हटले की, "राजौरी येथून एक धक्कादायक बातमी समजली आहे. आपण जम्मू-काश्मीरधील एक अधिकारी गमावला आहे. काल ते उपमुख्यमंत्र्यांसोबत दौर्‍यावर होते आणि मी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीतही सहभागी झाले होते. आज त्यांच्या निवासस्थानी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये आपल्या राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मी अत्यंत दुःखी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."

राज कुमार ठाकूर बरोबर असलेल्या कर्मचारयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबारात आणखी काही सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0