WAVES Summit 2025 मध्ये चिरंजीवींचा भावनिक प्रवास: "मिथुनदा, आणि कमल हासन हे माझे गुरू"

    01-May-2025
Total Views |

WAVES Summit 2025
 
मुंबई: ( WAVES Summit 2025 ) मुंबईत सुरू असलेल्या WAVES Summit 2025 च्या पहिल्याच दिवशी अभिनेता चिरंजीवी यांनी आपल्या कलाजिवनाचा एक अतिशय भावस्पर्शी पट उलगडला. अक्षय कुमार यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या ‘Legends & Legacies: The Stories That Shaped India’s Soul’ या विशेष सत्रात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
 
चिरंजीवी म्हणाले, “लहानपणी मी माझ्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांचे मनोरंजन नृत्याद्वारे करत असे. तिथूनच अभिनयाकडे ओढ निर्माण झाली. पुढे मी चेन्नईला गेलो, आणि पाहिलं तर आधीच अर्धा डझन सुपरस्टार्स तिथे प्रस्थापित होते. मग मी स्वतःला विचारलं – ‘मी यात काय वेगळं देऊ शकतो?’ आणि मी ठरवलं – माझं लक्ष्य हाच केंद्रबिंदू (bullseye) असणार!” त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा उल्लेख करत एक खास प्रेरणा शेअर केली – “१९७७ मध्ये मी फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होतो. तेव्हा मी मिथुनदा यांचं ते राष्ट्रीय पुरस्कार विजेतं अभिनय पाहिलं.
 
त्यांचा नैसर्गिक अभिनय पाहून मी ठरवलं, ‘आपणही मेकअपशिवाय सामान्य मुलासारखंच दिसायला हवं.’ हे त्यांच्या शैलीचं सौंदर्य होतं.” ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करत चिरंजीवी म्हणाले, “मी त्या चित्रपटातून शिकलं की, अॅक्शन दृश्यं स्वतः करायची. त्यातून मला अमिताभ बच्चन यांचं धाडस आणि समर्पण शिकायला मिळालं.” तसेच, त्यांनी नृत्याच्या बाबतीत कमल हासन यांना आपले गुरू मानले. “कमल हासन माझे सीनियर होते आणि त्यांच्याकडून मी नृत्याची शैली, अभिव्यक्ती शिकली. त्यांचं प्रत्येक मूव्हमेंट माझ्यासाठी शिकवण ठरली.”
 
या सत्रात चिरंजीवींनी स्पष्टपणे सांगितलं की, ते फक्त स्टार बनण्याचा नाही तर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. स्वत:ची ओळख तयार करणं हेच त्यांच्या अभिनयप्रवासाचं मुख्य ध्येय होतं. WAVES Summit च्या या सत्रातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – ज्या कलावंतांकडून संपूर्ण देश प्रेरणा घेतो, तेही आपल्या प्रेरणांचा नम्रतेने उल्लेख करतात. चिरंजीवींच्या या कथनाने उपस्थितांची मने जिंकली आणि नवउद्योजक व कलाकारांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला.