प्लास्टिक वाढवतय हृदयविकाराचा धोका

01 May 2025 15:56:32
प्लास्टिक वाढवतय हृदयविकाराचा धोका

मुंबई
: प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाचे महत्त्वाचे घटक बनले आहे, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर आहे. नव्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे – प्लास्टिकमधील रसायनांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आहे. 'ईबायोमेडिसिन' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, प्लास्टिक बनवताना वापरल्या जाणाऱ्या 'फॅथेलेट्स' नावाच्या रसायनामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

या रसायनाचा शरीरावर हळूहळू विषारी परिणाम होतो. फॅथेलेट्स हे प्लास्टिक मऊ आणि लवचिक बनवण्यासाठी वापरले जातात. हे रसायन प्लास्टिकमध्ये अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे आढळते. त्यामुळे ते माणसाच्या शरीरात सहजपणे प्रवेश करू शकते.

संशोधनानुसार, २०१८ मध्ये प्लास्टिकमुळे जगभरात ३.५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हृदयरोगाने झाला. भारतात १,०३,५८७ लोकांचा बळी गेला असल्याचेही यात सांगितले आहे. ही जनजागृतीसाठीचा एक इशारा आहे.
प्लास्टिकचा वापर टाळा, नैसर्गिक पर्याय निवडा असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांच म्हणणे आहे म्हणूनच प्लास्टिकच्या ऐवजी शक्यतो स्टील, तांब इ...ची भांडी, डबे, बाटल्या वापराव्यात.
Powered By Sangraha 9.0