भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर बंदी

01 May 2025 18:29:08

भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर बंदी

नवी दिल्ली
: भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला, पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडियावर बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने पाकिस्तानमधील १६ युट्युब चॅनल्स बंद केले होते. आता त्या बरोबरच भारतातील युजर्ससाठी काही पाकिस्तानी कलाकारांची इन्स्टाग्राम अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत.


या कारवाईमुळे माहिरा खान, हानिया आमिर यांसारख्या लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम प्रोफाइल्स भारतीय युजर्सना दिसणार नाहीत. माहितीनुसार, इतर काही कलाकारांचे अकाउंट्सही लवकरच भारतात ब्लॉक केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामागे भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची भूमिका असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांनावर बंदी घालणे हे यामागचे प्रमुख कारण आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात डिजिटली सुरू असलेला हा संघर्ष आता आणखी मोठा होत चालला आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या देवाणघेवाणीवर निर्बंध घालायचे हे पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे. काही अभ्यासक या निर्णयाच्या बाजूने, तर काहींनी विरोधात आहेत.


Powered By Sangraha 9.0